जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात अमळनेर शहर हे कोरोनासाठी हॉटस्पॉट बनले असून आज पुन्हा १४ रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आल्याने येथील संसर्गाची व्याप्ती भयंकर प्रमाणात वाढल्याचे दिसून आले आहे. तर कोरोना बाधीतांच्या मृतांची संख्या १६ झालेली आहे.
पॉझिटिव्ह आढळलेले सर्व रूग्ण हे अमळनेर शहरातील आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 116 इतकी झाली असून त्यापैकी १६ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर तीन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.
अमळनेर येथे कोरोनाचा सामूहिक संसर्ग सुरू झाल्याची भिती आता व्यक्त करण्यात येत आहे. शहरात पाच दिवसांचा कर्फ्यू पाळण्यात येत असला तरी आधीच झालेल्या संसर्गातून कोरोनाची व्याप्ती भयावह पातळीवर पोहचल्याचे यातून दिसून आले आहे.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००