जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारत देशाला ऑलिम्पिक खेळात तसेच आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय कुस्तीमध्ये पदक मिळवून भारताचे नाव अजरामर करणाऱ्या सात महिला खेळाडूंसोबत कुस्ती महासंघाचे अध्यक्ष यांनी अन्याय अत्याचार केला, त्याबाबत त्यांच्यावर गुन्हा नोंदवून चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी जळगाव जिल्हा महिला असोसिएशनच्यावतीने गुरूवार ४ मे रोजी स्वाक्षरी मोहिम राबविण्यात आली.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारतीय कुस्ती महासंघाविरोधात दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा धरणे आंदोलन करत आहेत. कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी घेऊन पैलवानांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. भारत देशाला ऑलिम्पिक खेळात तसेच आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय कुस्तीमध्ये पदक मिळवून भारताचे नाव अजरामर करणाऱ्या सात महिला खेळाडूंसोबत कुस्ती महासंघाचे अध्यक्ष यांनी अन्याय अत्याचार केला असा आरोप केला आहे. खासदार ब्रिज भूषण सिंग यांच्यावर येवन शोषण प्रकरणी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. या अनुषंगाने दिल्ली येथे आंदोलनास बसलेल्या भारतीय महिला कुस्तिगर संघटनेच्या खेळाडूंच्या आंदोलनास पाठिंबा म्हणून जळगाव जिल्हा महिला असोसिएशनच्यावतीने स्वाक्षरी मोहिम राबविण्यात आली.
याप्रसंगी महिला असोसिएशनच्या माजी अध्यक्ष वासंती दिघे, अध्यक्षा राजकुमारी बाल्दी, सचिव जोत्सना बऱ्हाटे, उपाध्यक्ष मंलनाथ नगरकर, भारती पाथरकर, सहसचिव अंजली पाटील, वैशाली पाटील, चंद्रकला परदेशी, कमल पाटील, छाया गडे आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.