जळगाव, प्रतिनिधी । गुरुवार २ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ चे प्र-कुलगुरू प्राध्यापक माहुलीकर यांनी विद्यापीठाबद्दल विद्यार्थ्यांना संदेश देण्यासाठी विद्यापीठाची वेबसाईटचा उपयोग न करता थेट अखिल भारतीय विद्यार्थी परिषद एबीव्हीपीच्या फेसबुक लाईव्ह पेजवरून आपला संदेश दिला याचा एनएसयुआय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी दूरध्वनीवरून प्र-कुलगुरु माहुलीकर यांना खडसवुन निषेध करत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनासोबत खेळणाऱ्या या संघशाही लोकांना आता आम्हीच पदावरून खाली उतरल्या शिवाय राहणार नाही असा इशारा दिला.
एनएसयुआय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी प्र-कुलगुरू माहुलीकर यांना सांगितले की, विद्यापीठ हे शिक्षणाचे माहेरघर असतं विद्यापीठांमध्ये कुठल्याही प्रकारचा राजकीय व्यास नसतो. परंतु, आजपर्यंत जळगाव जिल्हा एनएसयूआय विद्यापीठावरती व व विद्यापीठांमधील काही लोक शासनाची फसवणूक करून व केवळ आणि केवळ संघाचा व भाजप सरकारचा फायदा घेऊन विद्यापीठातील पदावरती येऊन बसले म्हणजेच संघशाहीपणा विद्यापीठांमध्ये जे लोक रुजवत होते, त्याचंच एक उदाहरण आज प्र-कुलगुरू माहुलीकर यांनी एका विशिष्ट विद्यार्थी संघटनेच्या फेसबुक लाईव्ह पेजवरती येऊन संपूर्ण खानदेशला दाखवून दिले. त्यामुळे जळगाव जिल्हा एनएसयुआयतर्फे एका विशिष्ट राजकीय संघटनेला झुकते माप देऊन आपण त्याचे पाईक आहोत असे दर्शवणाऱ्या प्र-कुलगुरू माऊलीकर यांचा जाहीर निषेध. विद्यापीठबद्दल विद्यार्थ्यांना एखादा संदेश देण्यासाठी विद्यापीठाची वेबसाईट किंवा प्रिंट मीडिया उपलब्ध असताना देखील केवळ आणि केवळ फक्त संपूर्ण खानदेशाला दाखवून देण्यासाठी की विद्यापीठांमध्ये आता संघशाही सुरु आहे व त्यामुळे विद्यापीठाची अधिकृत वेबसाईट व प्रिंट मीडिया यांना डावलून थेट राजकिय विद्यार्थी संघटनेच्या फेसबूक पेज वरून विद्यार्थ्यांना संबोधने,हे अत्यंत बेजबाबदारपणाचे लक्षण हे आज प्र-कुलगुरू माहुलीकर यांनी दाखवून दिले व माहुलीकर व दिलीप रामू पाटील यांच्यासारखे संघशाही मधील लोक यांना जर राजकारणच करायचे असेल तर त्यांनी विद्यापीठांमधील पदसोडून थेट राजकारणात उतरावं अन्यथा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनासोबत खेळणाऱ्या या संघशाही लोकांना आता आम्हीच पदावरून खाली उतरल्या शिवाय राहणार नाही असा इशारा जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी दिला आहे.