जळगाव, प्रतिनिधी | येथे हिंदू सिंधू तीर्थस्थळाची निर्मिती करण्यात येणार असून भगवान श्रीरामांची १०१ फुटाची आणि झुलेलाल भगवान यांची भव्य मूर्ती पाचदेवी मंदिर येथे या मंदिराची स्थापना होणार आहे. तसेच २६ जानेवारी रोजी जळगाव शहरातून भव्य शोभायात्रा जुन्या जळगावातील राम मंदिर येथून काढण्यात येणार आहे अशी माहिती झुलेलाल साई मानव संस्थेचे अध्यक्ष नीरज जेस्वानी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सिंधी कॉलनी येथे झुलेलाल सेसा (भंडारा ) दररोज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शहरातील तसेच हिंदू सिंधू साधू संतांचे भव्य मुझियम उभारण्यात येणार आहे. गरजू रुग्णांसाठी हॉस्पिटल देखील येथे उभारण्यात येणार आहे. याचं मंदिर उभारण्याच्या निमित्ताने २६ जानेवारी रविवार रोजी सकाळी ११ वाजता साधू संताच्या उपस्थीतीत जुने जळगाव येथील प्रभू श्रीराम मंदिरापासून भव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारच्या सुमारास महाप्रसाद आयोजन देखील यावेळी करण्यात आले आहे. यावेळी श्रीराम मंदिराचे गादिपती मंगेश महाराज जोशी, संत संतोष लालजी महाराज, अमरावती, संत देविदास जी., संत बंटी बाबा, संत साई गोपाल देशमुख, संत लीलाराम परस रामजी, संत साई सुरेंद्र दास, ग्यान गंगा ईश्वर प्रेम आश्रम. संत स्वामी नारायण सरस्वतीजी आदीची उपस्थिती राहणार आहे.भगवान श्रीराम आणि झुलेलाल भगवान यांच्या मूर्ती साकारण्यासाठी प्रसिद्ध मूर्तिका येणार असून सुमारे २५ ते ३० कोटी रुपये मूर्ती उभारणीसाठी खर्च अपेक्षित आहे. झुलेलाल साई मानव संस्थेतर्फे मंदिर उभारणीसाठी ३ वर्षांचा कालावधी लागणार आहे. तसेच जळगावत बाबा गोधडीवाला जंक्शन निर्मिती करण्यात येणार असून यात भाविकांसाठी विविध तीर्थक्षेत्र दर्शन घेण्यासाठी रेल्वेची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेला संजय हिराणी , अनिल जोशो, वासुदेव पारपियानी , संतोष वालीचा आदी उपस्थित होते.