जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरातील एका भागात राहणारी ६ वर्षीय चिमुकलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विनयभंग करणाऱ्या तरूणाला पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याप्रकरणी सोमवारी १५ मे रोजी रात्री ११ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुप्रीम कॉलनी परिसरात तील एका भागात ६ वर्षीय चिमुकली ही आई-वडिलांसह वास्तव्याला आहे. १५ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास पिडीत मुलगी ही घरी असताना संशयित आरोपी अर्शद रब्बू पटेल (वय 21) याने तिला जवळ बोलून तिच्याशी अश्लिल कृत्य करत तिचा विनयभंग केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी अर्शद रब्बु पटेल (वय 21) याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपीला अटक करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक रूपाली महाजन करीत आहे.