जळगाव प्रतिनिधी । शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात जुगाराच्या अड्ड्यावर सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाने छापा टाकून ३७ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करून चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीजवळील जावेद टायर पंचर दुकानाच्या मागे मोहित मेन्स पार्लरच्या भिंतीला लागून चार जण बेकायदेशीर सट्टा व जुगार खेळ असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांना मिळाली त्यानुसार बुधवार ६ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पथकाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजूला कारवाई करून संशयित आरोपी पंढरीनाथ भोजू हटकर (वय-४८) रा. म्हसावद ता.जि.जळगाव, राजू गजानन पाटील (वय-२४) रा. रामेश्वर कॉलनी, रामभाऊ निना पाटील (वय-५३) रा. रामेश्वर कॉलनी या तिघांना ताब्यात घेतले. तिघांची अंगझडती घेतली असता ६ हजार ४३० रूपये रोख आणि ३० हजार रूपये किंमतीची मोटारसायकल असा एकुण ३७ हजार ४३० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
पोलीस उपनिरीक्षक सुनिल पाटील, पोहेकॉ किरण धमके, पोहेकॉ राजेश चौधरी, पो.ना. महेश महाले, पो.कॉ. रविंद्र मोतीराया, पो.कॉ. रोहिदास आगोणे, पो.कॉ. गोपाल पाटील, पो.कॉ. अनिल खोंदले, पो.कॉ. अभिषेक पिसाळ यांनी कारवाई केली.