जळगाव, प्रतिनिधी ।दिवसेंदिवस वाढत असलेली व्यसनाधीनता व समाजावर होणारे विविध दुष्परिणाम कशा प्रकारे कमी करता येतील याकरिता आरोग्य भारती व जीवन ज्योती व्यसनमुक्ती उपचार व मार्गदर्शन केंद्रातर्फे विशेष समुपदेशनाचा कार्यक्रम रुग्ण मित्रांसाठी संस्थेच्या रिंग रोड येथील आवारात करण्यात आले होते.
आरोग्य भारतीच्या अध्यक्ष तसेच डॉ. के. डी. पाटील मल्टीस्पेशलिटी रूग्णालयाच्या संचालीका डॉ. लीना पाटील, आरोग्य भारतीचे सचिव कृणाल महाजन, जीवन ज्योती व्यसनमुक्ती उपचार व मार्गदर्शन केंद्राचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाळासाहेब कुमावत, वेसणील प्लसचे डॉ. प्रीतम कूमावत, सामाजिक कार्यकर्ते मुकुंद गोसावी, जनसंपर्क अधिकारी जयेंद्र पाटील आदींसह मित्र परिवार याप्रसंगी उपस्थित होते.
जीवनातील नैराश्य व्यसनाचे प्रकार उपाय अपाय जीवनातील दिनचर्या संस्कार वागणूक याबाबत डॉ. लीना पाटील यांनी विस्तृत चर्चा करीत प्रश्न उत्तराने ही रुग्ण मित्रांचे समाधान केले. डॉ. बाळासाहेब कुमावत यांनी वाढती व्यसनाधिनता कशाप्रकारे हानिकारक असून त्यास कसे रोखावे याबाबत मार्गदर्शन केले. निरोगी जीवनाकरिता कृणाल महाजन यांनी योगाची माहिती देऊन सुदृढ जीवन पद्धतीबाबत कसे जगावे याबद्दल मार्गदर्शन केले. डॉ. प्रीतम कुमावत यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी डॉ. शशिकांत गाजरे डॉ. एस. जी बडगुजर, डॉ. हर्षल बारी, डॉ. अश्विनी मारवल आदींचे सहकार्य लाभले.