जळगाव प्रतिनिधी । राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन ३५ वर्षीय विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी पिंप्राळा परीसरातील मयूर कालनीत उघडकीस आली.याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, ज्योती जितेंद्र राठोड (वय ३५) रा. मयुर कॉलनी, पिंप्राळा या आपले पती जितेंद्र फुलसींग राठोड सोबत राहतात. विवाहिता ब्युटी पार्लर चालवून कुटूंबाच्या उदर निर्वाहास आर्थीक हातभार लावतात. रविवारी रात्री उशीरापर्यंत दाम्पत्य जेवन करून झोपले. आज सकाळी विवाहितेने झोळीच्या सुती दोरीने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. रामानंद नगर पोलीसांनी घटनास्थळ धाव घेवून पंचनामा केला. बेशुद्ध अवस्थेत नेलेल्या विवाहितेला रुग्णालयात वैद्यकिय अधिकारी यांनी मृत घोषित केले. या प्रकरणी रामनद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास मनोज राठोड हे करीत आहे.