Home Cities जळगाव जळगावात वादळी वाऱ्यासह बरसला पाऊस !

जळगावात वादळी वाऱ्यासह बरसला पाऊस !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरात रविवारी ४ जून रोजी दुपारी १२ वाजता वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. या वादळी व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे रिंगरोड, अजिंठा विश्रामगृह आणि गोलाणी मार्केट परिसरातील झाडे कोलमडून पडली आहे. यामुळे काही चारचाकी व दुचाकींचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

 

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनने हजेरी लावल्याचे रविवारी ४ जून रोजी दुपारी १२ वाजता पहायला मिळाले. दुपारी अचानकरित्या वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शासकीय अजिंठा विश्रामगृह येथे मोठे झाड कोसळल्याने पार्किंगला लावलेल्या चारचाकी व  दुचाकी दाबल्या गेल्या. शिवाय शहरातील रिंगरोड आणि गोलाणी मार्केटजवळील माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या बंगल्याजवळ देखील वादळीवाऱ्यामुळे झाडे कोलमडून पडली आहे. या सुदैवाने कुणालाही दुखापत झालेली नाही. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून उकाळ्यामुळे नागरीक हैराण झाले होते.रविवारी दुपारी १२ वाजता पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता.


Protected Content

Play sound