जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील सुप्रीम कॉलनी येथे राहणाऱ्या ७० वर्षीय वयोवृद्धाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवार ३ सप्टेंबर रोजी घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी असलेल्या मज्जिद जवळ हुसेन गयास पटेल (वय ) हे वयोवृद्ध आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला होते. दरम्यान शनिवार ३ सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजेच्या पूर्वी त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीला आले. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता त्यांना मयत घोषित केले. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप कळू शकले नाही. यासंदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.