जळगाव (प्रतिनिधी) येथील कालींका माता मंदिराजवळ आज सकाळी लक्झरीने दुचाकीला दिलेल्या धडकेत एक जण ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.
या संदर्भात अधिक असे की, आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास कालींका माता मंदिराजवळ दुचाकी क्रमांक एमएच १९, बी.यु.७७७७ ही जळगाव शहराकडे येत होती. त्यावेळी समोरून भरधाव वेगाने येणारी लक्झरी क्रमांक एम.एच. ०४ जी.८८०५ ने दुचाकी जोरदार धडक दिली. या अपघातात मोटार सायकल स्वार लक्झरीच्या चाकात येऊन चिरडला गेला. या अपघातात नारायण दौलत पाटील (रा.सामनेर ता.पाचोरा) हे मयत झाले असून त्यांचे सोबतचे गणेश पाटील हे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात कालींका मंदिरा जवळील गोदावरी कॉलेज समोर झाला. सदर अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांनी आपले सहकारी पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय नेरकर, इम्रान सय्यद, मुकेश पाटील, सचिन चौधरी, चालक भूषण सोनार यांच्यासह अपघातस्थळी जाऊन धाव घेऊन जखमीला दवाखान्यात रवाना केले. तसेच वाहतूक सुरळीत केली.