जळगावात मोबाईल विक्रेत्याला मारहाण; पोलीसात गुन्हा (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । मोबाईल दुकानावर मोबाईल घेण्यावरून वाद होऊन चार ते पाच तरूणांनी मोबाईल विक्रेत्याला मारहाण केल्याची घटना आज दुपारी १.३० वाजेच्या सुमारास घडली. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून शहर पोलीसात अज्ञात तरूणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, लक्ष प्रतापराय कुकरेजा (वय-२०) रा.संतोषी माता मंदीराजवळ, सिंधी कॉलनी यांचे शहरातील गोलाणी मार्केट मध्ये सोनी मोबाईल नावाचे तीन दुकान आहे. आज दुपारी १.३० वाजेच्या सुमारास दुकानावर मोबाईल घेण्यासाठी चार ते पाच तरूण सोबत आले होते. त्यावेळी लक्ष यांचा भाऊ सुनिल प्रतापराय कुकरेजा यांनी काही मोबाईल दाखविले. मात्र तरूणांनी जास्त किंमत असल्याचे सांगून दुकानदार सुनिल कुकरेजा याला, ‘तुमच्या तंगड्या तोडून तुमच्या हातात देतो, इथेच थांबा मी मुलांना बोलावून आणतो’ असे सांगून शिवीगाळ केली व कानशिलात लगावली. त्यानंतर लक्ष कुकरेजा याने तरूणांना आवरण्याचा प्रयत्न केला असता त्याला देखील चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच दुकानातील काचा फोडून टाकल्या. घडलेला प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. लक्ष कुकरेजा यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीसात अज्ञात चार ते पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content