जळगाव प्रतिनिधी । शहरातील गेंदालाल मिल परिसरातील मेडीकल स्टोअर्स अज्ञात चोरट्यांनी फोडून गल्ल्यातील २७ हजार रूपयांची रोकड लंपास केल्याची घटना बुधवारी घडली होती यातील एक संशयित आरोपीस त्याच्या ताब्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
फिरोज अन्सार शेख (वय-२१) रा. गेंदालाल मिल असे आरोपीचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, बाळासाहेब लक्ष्मण पाटील (वय-४७) रा. दादावाडी, जळगाव यांचे गेंदालाल मिल परिसरात रामकृष्ण मेडीकल दुकान आहे. हे दुकान गेल्या २०-२५ वर्षांपासून ते चालवत आहे. मंगळवारी रात्री ११ वाजता त्यांनी मेडीकल बंद करून घरी गेले. बुधवारी सकाळी दुकानासमोर चहाचे टपरीवाल रविंद्र मंडलिक याला दुकानाचे कुलूप तोडल्याचे लक्षात आल्याने त्यांनी बाळासाहेब पाटील यांना फोन दुकानात चोरी झाल्याचे सांगितले. पाटील यांनी तत्काळ मेडीकलवर धाव घेतली असून दुकानात चोरी केल्याचे लक्षात आले. दरम्यान दुकानातील गल्ल्यातील २७ हजार रूपयांची रोकड लंपास केली होती. शहर पोलीस ठाण्याचे सुधीर साळवे, अक्रम शेख यांनी आरोपीस अटक केली आहे.
शहर पोलिस ठाण्याचे स.फौ.वासुदेव सोनवणे, पोहेकॉ विजय निकुंभ, गणेश शिरसाठ, भास्कर ठाकरे, दीपक सोनवणे, रतन गीते, तेजस मराठे, रवींद्र साबळे, अक्रम शेख , सुधीर साळवे यांनी कारवाई करत संशयित आरोपी फिरोज अन्सार शेख (वय-२१) रा. गेंदालाल मिल परिसर याला चोरून नेलेल्या मुद्देमलासह अटक करण्यात आले आहे.