जळगाव, प्रतिनिधी । शिवसेना बळीरामपेठ शाखा व आझाद क्रिडा सांस्कृतिक मित्र मंडळ याचां संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आज रविवार दि. ४ एप्रिल रोजी सकाळी ठिक १० ते ३ दरम्याण शिवसेना बळीरामपेठ शाखा व आझाद क्रिडा सांस्कृतिक मित्र मंडळ याचां संयुक्त विघामानाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी युवकांनी मोठ्या संख्येने रक्तादान केले. याप्रसंगी शिवसेना विभागप्रमुख विपीन पवार, समाजिक कार्यकर्ता जितु बागरे, शिवसेना उपविभाग प्रमुख जितेद्रं गवळी, निर्भय पाटील, अक्षय पिगंळे, गजानन परदेशी आदी उपस्थित होते. व यावेळी मोठ्य संख्येने रक्तादाते उपस्थित होते. या शिबिरास गोवळकर रक्त पेढीचे विशेष सहकार्य लाभले.