जळगाव प्रतिनिधी । शहरातील ऑर्किड हॉस्पिटलजवळील गुरूद्वारासमोरून पायी जाणाऱ्या महिलेच्या हातातील १० हजार रूपये किंमतीचा मोबाईल दुचाकीवरील अज्ञात दोघांनी हिसकावून पळ काढल्याची घटना गुरूवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, राखी मिस्त्रीलाल मुजालदे (वय-२३) रा. जळगाव ह्या महिला ऑर्किड हॉस्पिटलमध्ये कामाला आहे. गुरूवार १८ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास हॉस्पिटलजवळील गुरूद्वारा येथून पायी जात असतांना अज्ञात दोन जण दुचाकीवर येवून राखी मुजालदे यांच्या हातातील १० हजार रूपये किंमतीचा मोबाईल जबरी हिसकावून पळ काढला. त्यांच्या पाठलाग केला परंतू मिळून आला नाही. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात दोन चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि महेंद्र वाघमारे करीत आहे.