जळगावात महादेव मंदीरातून पितळी दिव्यांची चोरी

जळगाव  – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शहरातील गजानन कॉलनीतील असलेले जागृत महादेव मंदिरातून अज्ञात चोरट्यांनी १ हजार ४०० रुपये किमतीच्या दोन पितळी दिव्यांची चोरी केल्याचे समोर आले आहे. या संदर्भात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात शुक्रवार ११ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गजानन कॉलनी असलेल्या जागृत महादेव मंदिरातून ७०० रुपये किमतीचे दोन पितळी दिवे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे १० नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या समारास लक्षात आले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर येथील रहिवासी सुधाकर प्रल्हाद पाटील (वय-५६, रा. गजानन कॉलनी, जळगाव) यांनी शुक्रवार ११ नोव्हेंबर रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली व तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर रात्री ९ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक संदीप पाटील करीत आहे.

Protected Content