जळगाव प्रतिनिधी । महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंतीनिमित्त महाकारूणी बुध्द बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष भंते नागसेन यांच्याहस्ते इच्छादेवी पोलीस चौकीजवळ कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पोलीस कर्मचारी व नागरीकांना मास्कचे वाटप करण्यात आले.
महात्मा ज्योतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्ताने आज शहरातील इच्छोदवी पोलीस चौकीजवळ महाकारूणी बुध्द बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष भंते नागसेन यांच्यातर्फे एमआयडीसी पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूपासून बचाव व्हावा यासाठी घरघुती बनविलेले मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी पंचशिल नगर मित्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भिमसैनिकांना आवाहन
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व भिमसैनिकांनी १४ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजून १४ मिनीटांनी आपापल्या घरात बसून १४ मेणबत्ती लावून साजरी करावी. तसेच डॉ. बाबासाहेबांचे विचाराचे चिंतन व मनन करावे असेही आवाहन भंते नागसेन यांनी कळविले आहे.
यांची होती उपस्थिती
यावेळी भंते नागसेन, एमआयडीसी पोलीस कर्मचारी स.फौ. रामकृष्ण पाटील, राहुल शिरसाट, विजय बोदडे, जयपाल धुरंधर, अकबर तडवी, भला तडवी, संदीप वाघ, गौतम सुरवाडे, दिपक सुरवाडे, सुदर्शन तायडे, शारूख तडवी, योगेश मिस्तरी, राजू चौधरी, ईश्वर वाणी यांची उपस्थिती होती.