जळगावात बंद घर फोडले; दोन लाखांचा ऐवज लांबविला

जळगाव प्रतिनिधी । तीन ते चार दिवसांपूर्वी अज्ञात चोरट्यांनी नेहरू नगरातील बंद घरात डल्ला मारला होता. घर मालक मुळगावावरून परतल्यानंतर पाहणी केली असता, सुमारे १ लाख ९० हजार रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याचे समोर आले आहे.

अलका सुभाष भंगाळे या नेहरू नगरात राहतात. त्या मुळगावी नेरी येथे गेल्या असल्यामुळे घरी कुणीही नव्हते. हीच संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घरात डल्ला मारला. ही बाब त्यांच्या मुलगा हेमंत यांच्या लक्षात येताच त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु, स्वत:च्या घरात चोरी झाल्याची बाब उशिरा कळल्यामुळे शुक्रवारी अलका भंगाळे या जळगावात परतल्या. त्यानंतर त्यांनी घराची पाहणी केली असता त्यात त्यांना दागिने व कापसाचे पैसे असे एकूण १ लाख ९० हजार रूपयांचा ऐवज लंपास झाल्याचे दिसून आले. नंतर त्यांनी त्वरित एमआयडीसी पोलीस ठाणे गाठत ही माहिती दिली. तर पोलीस कर्मचारी रामकृष्ण पाटील यांनी पुन्हा घटनास्थळी जावून पाहणी केली.

फिर्यादीनुसार
अलका भंगाळे यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी दहा ग्रॅमची सोन्याची अंगठी, दहा ग्रँमच्या दोन टोंगल्स-साखळी, सोन्याच्या पाच ग्रँमच्या तीन अंगठ्या, पाच गॅ्रंमची चैन तसेच कापसाचे आलेले ७० हजार रूपयांची रोकड असा एकूण १ लाख ९० हजार रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याचे शुक्रवारी समोर आले.

Protected Content