चाळीसगावात भर दुपारी घरफोडी; रोकडसह सोने लंपास

चाळीसगाव प्रतिनिधी । शहरात आज भर दुपारी घरफोडी होऊन ५० हजार रूपये रोख व ९ ग्रॅम सोने लंपास करण्यात आल्याची घटना घडली आहे.

शहरातील भडगाव रोड भागातील विवेकानंद कॉलनी माजी मंत्री एम के अण्णा पाटील यांचे घराजवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष दिनेश पाटील यांचे भाचे योगेश रामराव पाटील यांच्या घराच्या गेटचे कुलूप तोडून आतील तीन दरवाजांचे कडी-कोयंडा चोरट्यांनी तोडले. यानंतर आतील कपाटातील रॉक ५० हजार रुपये व सोने चोरट्यांनी आज दुपारी तीन ते चार वाजेच्या दरम्यान चोरुन नेण्याची घटना घडली. यावेळी सदर घरातील दांपत्य हे बाजारात किराणा माल खरेदी करण्यासाठी गेले असल्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी ही घरफोडी केली आहे. हा संपूर्ण परिसर रहिवास भाग असून मध्यमवर्गीय व उच्चभ्रू लोकांची या भागात वस्ती आहे म्हणूनच भर दुपारी झालेल्या या घरफोडी ने परिसरात खळबळ माजली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, घटनेची खबर मिळाल्यानंतर चाळीसगाव पोलिस स्टेशनचे पोलीस घटनास्थळावर पोहोचून पंचनामा करून तपास काम सुरु केले आहे

Protected Content