जळगाव प्रतिनिधी । शहरातील नवीपेठेत डिश फिटींग करण्यासाठी आलेल्या व्यक्तीची १० हजार रूपये दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, संजय सुधाकर महाजन (वय-४७ ) रा. विशाल कॉलनीजवळ, गणेश कॉलनी हे ईलेक्ट्रिक आणि डिश फिटींगचे कामे करतात. मंगळवार २३ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास नवीपेठेतील पंजाब नॅशनल बँकेजवळ पार्किंगला लावली. डिश फिटींग व इलेक्ट्रिकचे काम आटोपून दुपारी १.३० वाजता दुचाकीजवळ आले. दुचाकी जागेवर नसल्याने त्यांनी परिसरात शोध घेतला. शोध घेवून दुचाकी आढळून आली नाही. संजय महाजन यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस नाईक सुंनंद तेली करीत आहे.