जळगाव (प्रतिनिधी) जळगाव शहरातील स्वॅब घेतलेल्या 29 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी 25 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 4 व्यक्तीचे तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.
पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये जळगाव शहरातील दक्षता नगरातील तीन व तांबापुरातील एका व्यक्तीचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या 475 इतकी झाली आहे. दरम्यान, आज सकाळी जळगाव, मुक्ताईनगर, भडगाव, भुसावळ, पाचोरा, अमळनेर, यावल, रावेर येथे स्वॅब घेतलेल्या 273 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल प्राप्त झाले होते. यापैकी 270 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 3 व्यक्तीचे तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले होते. तर पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये जळगाव, रावेर व अमळनेरच्या प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश होता.