जळगाव, प्रतिनिधी । आईच्या नावावर असलेले घर आपल्या नावावर करण्यासाठी परीरक्षण भूमापक आरोपी प्रमोद प्रभाकर नारखेडे यांना पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना आज रंगेहात पकडण्यात आले.
येथील रहिवासी असलेल्या एका ३५ वर्षीय व्यक्तीने दिलेल्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आली. तक्रारदार यांचे राहते घर बक्षिसपत्राद्वारे आईच्या नावावरून स्वतःच्या नावावर केलेले असून त्याबाबतची नोंद सिटी सर्वेच्या उताऱ्यावर लावण्याच्या मोबदल्यात आज (दि.१०) तक्रारदार यांचेकडे आरोपी प्रमोद प्रभाकर नारखेडे यांनी पंचासमक्ष ५००० रूपये लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम त्यांनी स्वतः स्वीकारली. त्यावेळी त्यांना पथकाने रंगेहात पकडले.
सदर कारवाई जिल्हाधिकारी कार्यालय परीसरात करण्यात आली. या सापळा पथकात Dy.S.P. जी.एम.ठाकुर, PI. निलेश लोधी, PI.संजोग बच्छाव, सहा.पोलीस उप निरीक्षक.रविंद्र माळी, पोहेकॉ.अशोक अहीरे, पोहेकॉ. सुरेश पाटील, पोहेकॉ. सुनिल पाटील, पोना.मनोज जोशी, पोना.सुनिल शिरसाठ, पोना.जनार्दन चौधरी, पोकॉ.प्रशांत ठाकूर, पोकॉ.प्रविण पाटील, पोकॉ. नासिर देशमुख, पोकॉ.महेश सोमवंशी, पोकॉ.ईश्वर धनगर यांचा समावेश होता.