जळगाव प्रतिनिधी । शहरातील एमआयडीसी परिसरातील मास्टर कॉलनीतील संतोषी माता मंदीराजवळ पालिकेच्या महिला सफाई कर्मचारी साफसफाई करत असतांना मागून येणाऱ्या अज्ञात दुचाकीने धडक दिली. यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना शहरातील खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. धडक देताच दुचाकीवरील दोघे फरार झाले. एमआयडीसी पोलीसात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.
याबाबत माहिती अशी की, माया गोवर्धन पेंडवाल (वय-४०) रा. गुरूनानक नगर, शनी पेठ हे जळगाव महानगरपालिकेचे महिला सफाई कर्मचारी आहेत. ते आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास एमआयडीसी परिसराच्या मास्टर कॉलनीतील संतोषी माता मंदीराजवळ साफसफाईचे काम करत असतांना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिली. अपघातात त्या गंभीररित्या जखमी झाल्या. जखमीवस्थेत त्यांना शहरातील खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. अपघात होताच दुचाकीवरील दोघे घटनास्थळाहून फरार झाले. दरम्यान, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी जखमी रूग्णाचे जाबजबाब नोंदवित आहे.