जळगाव प्रतिनिधी । तरूणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपीस पोलीसांनी अटक आज न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी की, शहरातील एका तरूणीशी संशयित आरोपी विजय उर्फ विक्की संजय ठाकूर (वय-२२) रा. शिवधाम अपार्टमेंट, द्वारका नगर याची ओळख झाली. विजय ठाकूर हा कार चालक आहे. त्यांच्याकडे कार क्रमांक (एमएच १४ सीएक्स १४०५) आहे. त्याने तरूणीशी जवळीक वाढविली. यात एप्रिल २०२० पासून ते ५ नोव्हेंबर २०२० पर्यंत नवीन काहीना काही आमिष दाखवत रेल्वे स्टेशन जवळील हॉटेल विसावा येथे अत्याचार केला. त्यानंतर याच काळात मोहाडी रोडवर त्याच्याजवळील व्हॅनमध्ये फोटो व व्हिडोओ बनवून घेतले. त्यानंतर व्हिडीओ आणि फोटो दाखवून तिच्यावतर अत्याचार केला. अत्याचार असह्य न झाल्याने पिडीत तरूणीने थेट एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी विजय ठाकूर यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलीसांनी संशयित आरोपी विजय ठाकूर याला रात्री ८ वाजता घरातून अटक केली. आज न्यायालयात हजर केले असता एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश कोळी करीत आहे.