जळगाव प्रतिनिधी । भिकमचंद जैन नगरात राहणाऱ्या तरूणीच्या बॅगेतून ७ हजार रूपये किंमतीचा मोबाईल पिंप्राळा रोडवरील पेट्रोल पंपासमोरून लांबविल्याची घटना रविवारी २८ रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वसुधा विश्वास महाजन (वय-२१) रा. भिकमचंद जैन नगर येथील तरूणी कामाच्या निमित्ताने सायंकाळी १८.३० वाजेच्या सुमारास शहरातील पिंप्राळा रोडवरील पेट्रोल पंपासमोर आल्या होत्या. त्याच्या पाठीला आलेल्या बॅगेत ठेवलेला ६ हजार रूपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी लांबविला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी जिल्हपेठ पोलीसात धाव घेतली. याप्रकरणी वसुधा महाजन यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द जिल्हपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रविण भोसले करीत आहे.