जळगाव प्रतिनिधी । शहरातील जी.एस. मैदानातून पायी जाणाऱ्या तरूणाचा रस्ता आडवून दोन जणांनी मारहाण केली. तर खिश्यातील १ हजार ३० रूपयांची रोकड लांबविल्याचे उघडकीला आले. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गजानन पंढरीनाथ खंन्ते (वय-२९) रा. शिरसोली ता.जि.जळगाव असे मारहाण केलेल्या तरूणाचे नाव आहे. सविस्तर माहिती अशी की, गजानन खंन्ते हा तरूण जळगाव तहसील कार्यालयात कामाच्या निमित्ताने आला होता. काम आटोपून ११ जून रोजी दुपारी ११ वाजता तहसील कार्यालयातून नविन बसस्थानकाकडे जी.एस. मैदानातून पायी जात होता. त्यावेळी अमर सिताराम बारूट (वय-३०) रा. शिवाजीनगर, हर्षवर्धन सुधाम पवार (वय-२०) रा. गेंदालाल मिल जळगाव यांनी गजाननचा रस्ता आडवला. गजाननला काहीही कारण नसतांना मारहाण करण्यास सुरूवात केली. दोघांनी गजानन यांच्या खिश्यातील १ हजार ३० रूपयाची रोकड लांबविली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.