जळगावात तरुणासोबत अनैसर्गिक कृत्य करत फोटो काढून मागीतली दोन लाखांची खंडणी; एकास जेरबंद

जळगाव प्रतिनिधी । दुकान मालकाच्या मुलाकास उसनवारीचे पैसे परत करण्याच्या बहाण्याने शेतात बोलावून त्याच्यासोबत एकाने अनैसर्गिक कृत्य केले. तर दुसऱ्याने या प्रसंगाचे मोबाईलमध्ये फोटो काढून घेतले. यानंतर हेच फोटो दाखवून पिडीत मुलाकडून ३० हजार रुपये उकळले. पुन्हा दोन लाख रुपयांची खंडणी मागीतली. दरम्यान, हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचताना सापळा रचुन पोलिसांनी एकास जेरबंद केले. तर त्याचा साथीदार बेपत्ता झाला आहे. शहर पाेलिस ठाण्याच्या हद्दीत २२ ते २७ जूलै दरम्यान या घटना घडल्या.

अर्जुन राजेंद्र सोनार (वय ३४, रा.शिवाजीनगर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. या घटनेतील पिडीत तरुण ३४ वर्षांचा असून दुकानादार आहे. त्याच्याच दुकानात अर्जुन काम करतो. दरम्यान, अर्जुनने दुकानदार असलेल्या पिडीत तरुणाकडून गेल्या वर्षी ५० हजार रुपये उधार घेतले होते. हे पैसे पिडीत तरुण परत मागत होता. पैसे परत करण्याच्या बहाण्याने २२ जूलै रोजी सकाळी ११ वाजता अर्जुनने पिडीत तरुणास शिवाजीनगर परिसरातील घराकडे बोलावले. यानंतर तरुणास शेतात घेऊन गेला. त्या ठीकाणी अर्जुनने त्याच्यासोबत अनैर्सिक कृत्य केले. तर अर्जुनच्या एका साथीदाराने हा प्रकार मोबाईलच्या कॅमेरात कैद केला. दरम्यान, कोणीतरी फोटो काढत असल्याचे सांगुन अर्जुन व पिडीत तरुणाने तेथुन पळ काढला होता. त्याच दिवशी दुपारी अर्जुनने पिडीत तरुणास फोन करुन सांगीतले की ‘आपले फोटो काढणारा मुलगा माझ्या घरी आला, त्याने मला फोटो दाखवून व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यामुळे माझ्या आईने त्याला १० हजार रुपये दिले आहेत. तु देखील त्याला २० हजार रुपये देऊन टाक.’ हे सांगीतल्यामुळे पिडीत तरुण देखील बदनामीच्या धाकाने घाबरला होता. त्याने दुसऱ्या दिवशी अर्जुनला घरी बोलावून १० हजार रुपये दिले. यानंतर अर्जुन व त्याच्या साथीदाराने पुन्हा एकदा पिडीत तरुणाच्या वडीलांशी संपर्क साधुन ४० हजार रुपये मागीतले, त्यातील २० हजार रुपये त्यांनी दिले. यानंतर २६ जूलै रोजी थेट दोन लाख रुपयांची मागणी केली. यावेळी पिडीत तरुणाच्या कुटंुबियांनी शहर पोलिस ठाण्यात संपर्क साधुन फिर्याद दिली. पाेलिसांनी हे प्रकरणी गांर्भीयाने घेत २७ जूलै रोजी पिडीत तरुणाच्या वडीलांकरवी पैसे देण्याच्या बहाण्याने सापळा रचुन अर्जुनला ताब्यात घेतले. तर त्याचा साथीदार बेपत्ता झाला आहे. या प्रकरणात अटकेतील अर्जुन याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक बिरारी, निलश पाटील तपास करीत आहेत.

Protected Content