जळगावात जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा संपन्न

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्हा योगासन स्पोर्ट असोसिएशन द्वारा जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा १० आणि ११ सप्टेंबर २०२२ रोजी मू. जे. महाविद्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये संपन्न झाली. यात राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याच्या खेळाडूंची निवड करण्यात आली.

नॅशनल योगासन स्पोर्टस फेडरेशन द्वारा तिसरी नॅशनल योगासन स्पोर्टस चॅम्पियनशिप नोव्हेंबर महिन्यात आयोजित होणार आहे. त्यामध्ये सहभागी होणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या राजस्तरीय योगासन संघाची निवड सप्टेंबर – २०२२  महिन्यात केली जाणार आहे. त्या अनुषंगाने या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपली जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेतून राज्य संघात निवड होणे गरजेचे आहे. त्या हेतूने जळगाव जिल्हा योगासन स्पोर्ट असोसिएशन द्वारा जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा १० आणि ११ सप्टेंबर २०२२ रोजी मू. जे. महाविद्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती.

सदर स्पर्धा सब ज्युनियर गट वय वर्ष ९ ते १४, ज्युनियर गट वय वर्ष १४ ते १८ आणि सीनियर गट वय  वर्ष १८ पेक्षा वरील अशा तीन गटांमध्ये मुले आणि मुली अशी वेगवेगळी आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचा शुभारंभ दि. १० सप्टेंबर रोजी सकाळी  ओंकार साधना व प्रार्थनेने करण्यात आला आणि समारोपीय कार्यक्रम ११ सप्टेंबर रोजी दुपारी ३ ते ५ या वेळात आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी व्यासपिठावर, महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन चे उपाध्यक्ष श्री. सतीशजी मोहगावकर,  क. ब. चौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे योग मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख इंजी. श्री. राजेश पाटील, जळगाव जिल्हा योगासन स्पोर्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि सोहम योग चे संचालक डॉ. देवानंद सोनार, सचिव प्रा. पंकज खाजबागे आणि सदस्य श्री. निलेश वाघ उपस्थित होते. टेक्निकल इन्चार्ज कु. श्रद्धा व्यास यांनी स्पर्धेचा अहवाल वाचन केला. त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांनी उपस्थित स्पर्धक, पालक , आणि प्रशिक्षकांना योग आणि योगासन स्पर्धांचे आधुनिक युगातील महत्व पटवून दिले. स्पर्धेतील खेळाडूंना भविष्यात उपलब्ध संधीविषयी यावेळी माहिती देण्यात आली.  सदर स्पर्धेतून महाराष्ट्र राज्याच्या राजस्तरीय योगासन  स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.  त्यामध्ये खालील विविध  गटातील खेळाडूंची निवड करण्यात आली.

राजस्तरीय योगासन स्पर्धेसाठी निवड झालेली गटानुसार स्पर्धक :-

 

अ) ट्रॅडिशनल योगासन इव्हेंट : 

१)सब ज्युनियर गट वय वर्ष ९ ते १४ मुली : 

प्रथम यशश्री प्रदीप नाद्रे, द्वितीय सानवी सुयेस बुरकुले, तृतीय –  नम्रता रवींद्र खडके

२) सब ज्युनियर गट वय वर्ष ९ ते १४ मुले :

प्रथम मोहित संजय बिर्हाडे, द्वितीय   मानस विजय बहेती, तृतीय –  ओजस किशोर मराठे

३) ज्युनियर गट वय वर्ष १४ ते १८ मुली:

प्रथम गौरी गणेश महाजन, द्वितीय पूर्वा दिनेश दुटे,  तृतीय –  यानिनी निना बोंडे

४) ज्युनियर गट वय वर्ष १४ ते १८ मुले:

प्रथम सूचित किशोर जोहरे, द्वितीय सागर किशोर चौधरी, तृतीय –  आशुतोष संतोष भोई

५) सीनियर गट वय  वर्ष १८ पेक्षा वरील मुली :  प्रथम मेघ घनराज धनगर, द्वितीय वैष्णवी विठ्ठलसिंग राजपूत

६) सीनियर गट वय  वर्ष १८ पेक्षा वरील मुले : प्रथम विवेक संजय चौधरी

 

ब) आर्टिस्टिक सिंगल

१) ज्युनियर गट वय वर्ष १४ ते १८ मुली:  प्रथम गौरी गणेश महाजन, द्वितीय   पूर्वा दिनेश दुटे

२) सिनियर गट वय वर्ष  १८ पेक्षा वरील मुले:   प्रथम विवेक संजय चौधरी

 

क) रिदमिक पेअर

१) ज्युनियर गट वय वर्ष १४ ते १८ मुली:  प्रथम गौरी गणेश महाजन आणि  पूर्वा दिनेश दुटे

 

ड) आर्टिस्टिक पेअर

१) ज्युनियर गट वय वर्ष १४ ते १८ मुली:  प्रथम गौरी गणेश महाजन  आणि  पूर्वा दिनेश दुटे

 

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेल्या विद्यार्थ्याना यावेळी प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. सदर स्पर्धेसाठी तांत्रिक समितीमध्ये प्रा.अनंत महाजन, प्रा.सोनल महाजन, प्रा. ज्योती वाघ, श्रद्धा व्यास, वासुदेव चौधरी, स्वप्नाली महाले, डॉ. शरयू विसपुते, गौरव जोशी,राधिका पाटील, साहिल तडवी, स्मिता बुरकुल, सौरभ साकळकर, शुभम पाटील, तेजस्विनी चौधरी, रोहिणी पाटील यांनी कार्यभार सांभाळला. 

स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी जळगाव जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन चे सचिव प्रा. पंकज खाजबागे, कोषाध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, सदस्य निलेश वाघ इतर सर्व पदाधिकारी आणि सोहम योग चे सर्व प्राध्यापक आणि आजी माजी विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पंकज खाजबागे यांनी केले तर आभार प्रा. सोनल महाजन यांनी व्यक्ते केले. शांतीपाठ करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Protected Content