जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरात बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्या दोन तरूणांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, शहरातील वैष्णवी पार्ककडे जाणाऱ्या रोडवरील मातोश्री शाळेजवळ एका तरूणाच्या हातात चॉपर असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज दुपारी १ वाजेच्या सुमारास मातोश्री शाळेजवळून संशयित आरोपी पवन नारायण कापसे (वय-२५) रा. वैष्णवी पार्क, मातोश्री शाळेजवळ याला अटक केली. अधिक चौकशी केली असता त्याने हा चॉपर मित्र परेश आनंदा गोयर (वय-२६) रा. वैष्णवी पार्क याच्याकडून घेतला असल्याचे सांगितले. तालुका पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास तालुका पोलीस कर्मचारी करीत आहे.
यांनी केली कारवाई
पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार राजेंद्र पाटील, अशोक महाजन, पोहेकॉ सुधाकर अंबोरे, अनिल देशमुख, अशरफ शेख, दिपक शिंदे, इंद्रिस पठाण यांनी कारवाई केली.