जळगावात चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची मंत्री पदावरून हकालपट्टी  करण्यात यावी अशी मागणी करत त्यांच्या प्रतिमेला जोडेमार आंदोलन करत जिल्हाआधिकारी कार्यालय येथे  परिवर्तन गृपतर्फे निषेध व्यक्त करून जिल्हाआधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

 

निवेदनाचा आशय असा की, भाजपचे शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शाळा सुरू केल्या. शाळा सुरू  करताना सरकार त्यांना अनुदान दिलं नाही. त्यांनी लोकांकडे भीक मागितली असे बेताल वक्तव्य केल्याने बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. चंद्रकांत पाटील यांनी केवळ बहुजन समाजाच्या महापुरूषांना त्यांच्या कार्य कर्तृत्वाला अपमानित केलेलं नाही, तर त्यांचा अजेंडा बहुजन समाजातील मुलं शिकू नयेत असा आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची मंत्री पदवारून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी परिवर्तन ग्रुप व  भिम नगर मित्र मंडळ परीवारीतर्फे करण्यात आली. याप्रसंगी सतीश गायकवाड, जितेंद्र केदार, भोजराज सोनवणे, सचिन सोनवणे, सचिन अडकमोल, जितेंद्र सोनवणे, शाम सोनवणे, विशाल आहिरे, अक्षय निकम, संदीप आहिरे, राहुल पारचा आदींची स्वाक्षरी आहे.

 

Protected Content