जळगाव प्रतिनिधी । अयोध्या नगरातील लक्ष्मी पार्कमध्ये बंद घर फोडून सोने, चांदीसह रोकड लंपास करणाऱ्या तिघा भामट्यांना एमआयडीसी पोलीसांनी अटक केली. तिघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, संजय निनाजी लेणेकर (वय-५४) रा. शेलापुर ता.मोताळा जि. बुलढाणा ह.मु. लक्ष्मी पार्क, अयोध्या नगर हे वडील आजारी असल्याने मुळ गावी परीवारासह १६ जानेवारी रोजी घराला कुलूप लावून गावाला गेले. दरम्यान वडील मयत झाल्याने ते परीवारासह तेथेच थांबले. २४ जानेवारीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बंद घर बघून कडीकोयंडा तोडून घरातील सोने चांदीच्या रकमेसह रोकड व इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू लंपास केली. शेजारी राहणारे सिमा सरोदे यांना लेणेकर यांच्या घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडलेला दिसून आला. त्यांनी तत्कार लेणेकर यांच्याशी संपर्क साधून घरात चोरी केल्याचे सांगितले. दरम्यान लेणेकर यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढील तपास सपोनि अमोल मोरे हे करीत आहे.
तीन संशयितांना अटक
पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवित संशयित आरोपी गुरूजीनसिंग सुजानसिंग बावरी (वय-२१) रा. शिरसोली नाका, तांबापूरा, विशाल संतोष भोई (वय-१८) रा. रामेश्वर कॉलनी आणि गिरीष अशोक जाधव (वय-२८) रा. खुपचंद साहित्या कॉलनी, मोहाडी रोड यांना आज दुपारी दीड वाजाता अटक केली.