जळगाव प्रतिनिधी । शहरातील दूध फेडरेशन परिसरातील वाघुळदे नगरातील घरफोडी करुन एलसीडी टीव्ही, मोबाईल, बॅग, बँकेचे पासबुक, दान पेटी व इतर साहित्य लांबविणार्या तीन संशयितांना शनिवारी मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. तिघांना आज न्यायालयात हजर केले असता २४ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
विठ्ठल उर्फ सोन्या अशोक लोंडे (25), पंकज उर्फ गोलु समुद्रे (22) व मिलिंद उर्फ आप्पा भिका व्यहाळे (28) सर्व रा.राजमालती नगर, दूध फेडरेशनजवळ अशी तिघा संशयितांची नावे आहेत.
काही तरुण पार्टीसाठी घरफोडी करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली होती. त्यानुसार बकाले यांनी उपनिरीक्षक रवींद्रसिंग गिरासे, सहायक फौजदार विजय पाटील, अशोक महाजन, संजय हिवरकर, राजेश मेढे, रवी नरवाडे, दिनेश बडगुजर, नरेंद्र वारुळे, प्रमोद लाडवंजारी, अविनाश देवरे, महेश महाजन व अशोक पाटील यांचे पथक दूध फेडरेशन, सुरत रेल्वे गेट या भागात कार्यरत ठेवले. या पथकाने त्यांना ताब्यात घेतले.
चौकशी केली असता त्यांनी वाघुळदे नगरातील यश संजय ठाकूर यांच्या घरातून एलसीडी टीव्ही, मोबाईल, बॅग, बँकेचे पासबुक, दान पेटी व इतर साहित्य लांबविल्याची कबुली दिली व जेथे हे साहित्य ठेवले होते तेथून काढून दिले. तिघांनपुढील कार्यवाहीसाठी शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आज न्यायालयात हजर केले असता तिघांना 24 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.