Home क्राईम जळगावात गोडाऊन फोडले;एक लाखाचा ऐवज लंपास

जळगावात गोडाऊन फोडले;एक लाखाचा ऐवज लंपास


जळगाव ( प्रतिनिधी ) शहरातील विवेकानंद नगरात असलेल्या इलेक्ट्रिक सामानाचे गोडाऊन आहे. सोमवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी गोडाऊनमधून १ लाख १४ रुपयांचा माल लंपास केला. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

येथील प्लॅट नंबर ४० पिप्राळा रोड प्रेमनगर येथे राहणारे प्रफुल्ल वसंतलाल झंवर याचे विवेकानंद नगरात इलेक्ट्रिक समानाचे गोडाऊन आहे. चोरट्यांनी गोडाऊनचा कडीकोंडा कापून आतप्रवेश करून सुमारे एक लाख १४ हजार रुपयांचा सामान चोरून नेला. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पी.एस.आय. सूर्यवंशी हे करीत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound