जळगाव प्रतिनिधी । तांबापूरा भागात बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्यावर एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या ताब्यातील १ हजार ८०० रूपये किंमतीची दारू हस्तगत केली.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, संशयित आरोपी लखन दिवान गुमाने (वय-३१) रा. गवळीवाडा, तांबापूरा हा लॉकडाऊनच्या काळात बेकायदेशील देशी दारू विक्री करत असल्याची माहिती एमआयडीसी पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ. अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, पो.ना. नितीन पाटील, इम्रान अली सैय्यद, पो.कॉ. गोविंदा पाटील यांनी आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्यांच्या घरी जावून कारवाई करत त्याच्या ताब्यातील १ हजार ८०० रूपये किंमतीची ३० लिटर गावठी हातभट्टीची दारू हस्तगत केली. पो.कॉ. मुद्दस्सर काझी यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी लखन गुमाने यांच्या विरोधात मुंबई दारूबंदी कायद्यानुसार एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.