जळगावात खाजगी शिक्षक शिक्षकेतर महासंघाची सहविचार सभा उत्साहात


जळगाव प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघाची सहविचार सभा नुकतीच गुरुवर्य प.वि. पाटील विद्यालयात संघटनेचे राज्य सहसचिव अशोक मदाने यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आली.

याप्रसंगी राज्य उपाध्यक्ष हेमंतकुमार पाटील, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, सर्व तालुका अध्यक्ष, सचिव आदी उपस्थित होते. याप्रसंगी जळगांव जिल्हा पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य यांची एकमताने निवड करण्यात आली.

कार्यकारिणी पुढीलप्रमाणे
जिल्हाध्यक्ष  हेमंत कुमार पाटील, कार्याध्यक्ष श्याम ठाकरे, उपाध्यक्ष हेमंत धांडे, भाऊलाल राठोड,  सचिव देवेंद्र चौधरी, सहसचिव मनोज पाटील, संघटनमंत्री योगेश चौधरी, कोषाध्यक्ष विलास पाटील, हिशोब तपासणीस राजू फालक यांची तर सदस्यपदी कुंदन सरोदे, प्रफुल्ल सरोदे, दीपक ढोके, रमेश सोनवणे, धनराज पवार,फायझोद्दीन शेख , बळवंत पाटील, दिलीप सिंग पाटील, गुलाबराव महाजन, मोतीलाल नाथजोगी, देविदास काळे, भरत चौधरी, संतोष मराठे, रवींद्र महाले, काझी सर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

सदर सभेमध्ये मागील सभेचे वृत्तांत वाचून कायम करणे. पुरस्कार प्राप्त शिक्षक यांच्या अभिनंदनाचा ठराव करणे. प्रत्येक तालुक्यातील कार्याचा आढावा घेणे. प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा करणे. तालुकास्तरावर सभासद नोंदणी करणे. तसेच जिल्हा संघटनेच्या कार्यपद्धतीबाबत चर्चा करून अंतिम करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

त्याचप्रमाणे शिक्षकांची अशैक्षणिक कामे, वैद्यकीय कॅशलेस बिल, बी एल ओ, तंबाखू मुक्त शाळा प्रबोधन, शिक्षण सेवकांचे मानधन, वैद्यकीय मान्यता, माध्यमिक प्रमाणे संचमान्यता, पटसंख्येनुसार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरती, निवडणुकीची कामे करताना योग्य मानधन मिळावे तसेच कर्मचाऱ्यांची व्यवस्था व्हावी, स्त्री बालसंगोपनाची रजा मिळावी, अंशतः अनुदानाचे टप्पे,विद्यार्थ्यांच्या जिल्हा क्रीडा स्पर्धा आयोजित करणे, वेतनेतर अनुदान, शिष्यवृत्ती परीक्षा, शाळांना पाच दिवसाचा आठवडा लागू करणे, टीईटी परीक्षा रद्द करणे,जिल्हा परिषद प्रमाणे खाजगी प्राथमिक शाळांना सुद्धा शालेय साहित्य मिळणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे, पीएफ डीसीपीएस ची स्लीप पे युनिट मार्फत मिळणे ,शालेय पोषण आहाराची स्वतंत्र यंत्रणा राबवणे, शालेय प्रवेशाची अट, इत्यादी विषयांवरती चर्चा घेण्यात आली.

प्रसंगी राज्य सदस्य टी.के.पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष शाम ठाकरे, जिल्हा सचिव देवेंद्र चौधरी, गोविंदा लोखंडे, राकेश पाटील, भाऊलाल राठोड, सुनिल पवार, जीवन महाजन, हेमंत धांडे  आदी उपस्थित होते.

Protected Content