जळगावात खदाणीत महिलेचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न; तालुका पोलीसात नोंद

जळगाव प्रतिनिधी । शहरातील तालुका पोलिस स्टेशनजवळ असलेल्या खदाणीत एका महिलेने शनिवार ६ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. परिसरातील नागरिकांसह पोलीस कर्मचारी तसेच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून तब्बल दोन  तासानंतर महिलेचे प्राण वाचविले आहे.  

जयश्री रविंद्र पाटील वय ३९ रा. आव्हाणे रोड,  सुदत्त कॉलनी असे महिलेचे नाव आहे.

प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार जयश्री रवींद्र पाटील या आव्हाणे रोड परिसरातील सुदत्त कॉलनीत कुटुंबासह वास्तव्यास आहेत. शनिवारी सकाळी जयश्री पाटील या सात वाजेच्या सुमारास घरातून बाहेर पडल्या. तालुका पोलिस स्टेशनजवळ असलेल्या खदानीत उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र भीती वाटल्याने त्या घसरतच खदानीत जावुन पडल्या. आत्महत्येचा प्रयत्नात असतांना  हा प्रकार या परिसरातून जात असलेल्या रामराव खिमा पवार या वॉचमनच्या लक्षात आला. रामराव पवार तातडीने खदानीत उतरले व महिलेला पाण्यातून बाहेर काढून काठावर बसविले. माहिती मिळाल्यावर  तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रविकांत सोनवणे, पोलिस हेडकॉन्स्टेबल  अनिल फेगडे यांच्यासह कर्मचार्‍यांनी घटनास्थळ गाठले. व महिलेला खदानीतुन वर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अग्निशमन विभागालाही याबाबत माहिती देण्यात आली. याच दरम्यान या परिसरात  रंगकाम सुरु असलेल्या ठिकाणाहुन पोलिसांनी रंगकामासाठि वापरली जाणारी  शिडी मागविली. तोपर्यंत अग्निशमन विभागाचे अश्वजित घरटे भारत बारी तेजस जोशी यांनीही घटनास्थळ गाठले. पोलिसांनी मागविलेल्या शिडी च्यासाहाय्याने अग्निशमन विभागाच्या कर्मचार्‍यापैकी एक कर्मचारी खाली उतरला. सुरुवातीला महिलेला पिण्यास पाणी देण्यात आले. यानंतर तिला शिडीच्या सहाय्याने खदानीतुन बाहेर काढण्यात आले.  यानंतर पोलिस कर्मचार्‍यांनी जयश्री पाटील यांना विचारपूस करत माहिती जाणून घेत माहिती. तसेच त्यांना घटनास्थळी पोहचलेल्या जयश्री पाटील यांची बहीण मीनाक्षी तसेच बहिणीचा मुलगा योगेश बाळू पाटील यांच्या स्वाधीन  करण्यात आले.

 

सकाळी साडेसात वाजेपासून सुरू असलेले बचावकार्य तब्बल दोन तासानंतर सव्वादहा वाजेच्या सुमारास संपले. घटनास्थळी परिसरातील नागरिकांची एकच गर्दी झाली होती. या कदाचित यापूर्वीही अनेक घटना घडलेल्या असल्याने ही खदाण लवकरात लवकर बुजविण्यात यावे अशी मागणी या वेळी नागरिकांनी बोलून दाखवली. महिलेच्या आत्महत्येच्या प्रयत्न केल्याच्या प्रकाराची तालुका पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान महिलेने आत्महत्येचा प्रयत्न का केला याबाबत नेमके कारण कळू शकलेलं नाही.

Protected Content