जळगाव प्रतिनिधी । जिल्हा वैद्यकिय शासकीय महाविद्यालयात १८ रोजी दाखल असलेल्या ५२ वर्षीय महिला रूग्णांचा आज मृत्यू झाला आहे. संशयित रूग्णाचे स्वॅब धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात पाठविण्यात आला असून अद्याप तपासणी अहवाल आलेला नाही.
याबाबत माहिती अशी की, १८ एप्रिल रोजी एका ५२ वर्षी महिलेला कोरोना संशयित म्हणून दाखल करण्यात आले होते. या महिलेचा आज १९ रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. संशयित महिलेचे स्वॅब धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात पाठविण्यात आला असून अद्याप तपासणी अहवाल येणे बाकी आहे.