जळगाव प्रतिनिधी । केंद्र सरकारने संमत केलेल्या कृषी विधेयकांचा विरोध करण्यासाठी आज आज देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. यात जळगावात गिरणा नदीच्या पुलाजवळ रास्ता रोको आंदोलन लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभाताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात करण्यात आले.
शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी, केंद्र सरकारने लोकशाहीला पायदळी तुडवत जे तीन विधेयक आणत शेती व शेतकऱ्यांवर जो अन्याय केला आहे. त्याविरुध्द आवाज उठवण्यासाठी व अन्याय कारक कामगार कायदे हाणून पडण्यासाठी विरोधी सर्वपक्षिय संघनेने शहरातील बांभोरी पुलाजवळ आज सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास रास्ता रोकोआंदोलन करण्यात आले आहे.
यावेळी लोकसंघर्ष मोर्चाचे प्रतिभाताई पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रभैय्या पाटील, अल्पसंख्याक आघाडी प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलीक, सामाजिक कार्यकर्ते फारूख शेख, राष्ट्रवादीचे प्रवक्ते योगेश देसले, माजी उपमहापौर करीम सलार, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, सामाजिक कार्यकर्ते विनोद देशमुख यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी तर विविध संघटनेचे नेते उपस्थित होते.
सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास रास्ता रोको आंदोलनास सुरूवात करण्यात आली. आंदोलन करण्यापुर्वी फारूख शेख यांना आंदोलनाची दिशा सांगितले. पुढील दहा दिवस प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हे आंदोलन होणार असल्याची माहिती प्रतिभाताई शिंदे यांनी सांगितले. रास्ता रोको आंदोलनास्थळी पोलीसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तत्पुर्वी नवनियुक्त पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी आंदोलनाच्या स्थळी भेट देवून सहाय्यक पोलीस अधिक्षक डॉ. निलाभ रोहन आणि सहाय्यक पोलीस अधिक्षक भाग्यश्री नवटके यांना आवश्यक त्या सुचना दिल्यात. शहरातील जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अकबर पटेल, रामानंद ठाण्याचे अनिल बडगुजर, तालुका पोलीस ठाण्याचे पो.नि. श्री. सोनवणे, शहर वाहतूक शाखेचे देवीदास कुनगर यांच्यासह पोलीस, महिला पोलीस होमगार्ड यांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होते.
राष्ट्रीय महामार्गावर आंदोलनास सुरूवात करण्यात आल्यानंतर महामार्गावरील दोन्ही बाजूने वाहतूक थप्प झाली होती. सुमारे १ ते 2 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागलेल्या होता. मात्र आंदोलन करतांना एका रूग्णवाहिकेला पुढे जावू देण्यात मदत केली. आंदोलनात मोठ्या प्रमाणावर घोषणबाजी करण्यात आली. शांततेच्या मार्गा आंदोलनाची सांगता करण्यात आली.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/457367718520170/
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/3144267049017465/