जळगाव प्रतिनिधी । युरीया खताची वाहतूक करणारा ट्रक चोरून नेल्याचा प्रकार ट्रान्सपोर्ट नगरात झाला. याप्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अफझल अब्बु खान (वय५०) रा. रामोशी वाडा ता.जि. नाशिक हे गेल्या पाच वर्षांपासून ट्रक क्रमांक (एमएच ४१ जी ५५३४) वर चालक म्हणून काम करतात. मालवाहतूक ट्रक असल्याने मिळेल तसे भाडे घेवून वाहतूक करत असतात. १० जुलै रोजी चोपडा येथे युरीया खताची ट्रीप मिळाली. चोपड्यात ११ जुलै रोजी सकाळी १० वाजता भरलेला ट्रक खाली केला. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता जळगावला आहे. शहरातील ट्रान्सपोर्ट नगरातील खूशी ट्रान्सपोर्ट जवळ ट्रल पार्किंगला लावला. व जेवन करण्यासाठी बाजुच्या ठिकाणी गेले. रात्री ८.३० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी ट्रक लांबविला. अफजल खान यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास आनंदसिंग पाटील करीत आहे.