Home Cities अमळनेर जळगावात आज ६४ नवीन रूग्ण; जिल्ह्यात २५४ पॉझिटीव्ह

जळगावात आज ६४ नवीन रूग्ण; जिल्ह्यात २५४ पॉझिटीव्ह

0
39


जळगाव प्रतिनिधी । जळगावात आज पुन्हा ६४ नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. तर अन्य तालुक्यांमध्येही पेशंटची संख्या वाढल्यामुळे आज जिल्ह्यात तब्बल २५४ नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत.

जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची माहिती दिली आहे. यानुसार आज जिल्ह्यात एकूण २५४ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधीक ६४ रूग्ण हे जळगाव शहरातील आहेत. याच्या खालोखाल यावल-२५; बोदवड-२४; चोपडा-२३; रावेर-२२ आणि चाळीसगाव-१९ अशी रूग्णसंख्या आढळून आली आहे.

अन्य ठिकाणांचा विचार केला असता, जळगाव ग्रामीण-३; भुसावळ-८; अमळनेर-१५; पाचोरा-४; धरणगाव- ६; यावल-८; एरंडोल-१३; जामनेर-२; पारोळा-३; मुक्ताईनगर-२१ आणि अन्य जिल्ह्यातील-२ अशी रूग्णसंख्या आहे.


Protected Content

Play sound