जळगाव प्रतिनिधी । लॉकडाऊन काळात शहरातील श्रीकृष्ण कॉलनीच्या एका घरात रंगलेल्या पत्त्यांचा डाव जिल्हा पेठ पोलीसांनी उधळून लावला आहे. या कारवाईत १२ जणांविरोधात जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या ताब्यातील ७० ते ८० हजार रूपयांची रक्कम पोलीसांनी हस्तगत केली आहे.
याबाबत माहिती अशी की, शहरातील बजरंग बोगद्याजवळील श्रीकृष्ण कॉलनीतील भागवत दयाराम पाटील यांच्या घरात पत्त्यांचा डाव रंगला असल्याची माहिती जिल्हापेठ पोलीसांना मिळाली. पोलीस निरिक्षक अकबर पटेल यांनी त्वरित पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांना बोलवून कारवाईच्या सूचना केल्या. पोलिसांच्या पथकाने शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास अचानक श्रीकृष्ण कॉलनीमध्ये पत्त्यांचा डाव सुरू असलेल्या घरात छापा मारला़ त्यावेळी १२ जण जुगार खेळताना आढळून आले.
यांच्यावर झाली कारवाई
जिल्हापेठ पोलिसांनी छापा मारला त्या घरात भागवत पाटील, ईश्वर दयाराम पाटील (रा. चंदूअण्णानगर), राहुल वसंत कापुरे (रा. खंडेरावनगर), मनोहर तुकाराम गजकुश (रा. आशा बाबानगर), धर्मेंद्र गंभीरराव पाटील (निवृत्तीनगर), सुनील जुलाल सपकाळे (रा. श्रीराम कॉलनी), संदीप देविदास माळी (रा.खंडेरावनगर), धिरज विजय पाटील (रा. गुजराल पेट्रोल पंपाजवळ), महेश राजेंद्र चिंचोले (रा. भोईटेनगर), मुरलीधर एकनाथ उशीर (रा़ भिकमचंद जैननगर), राजेंद्र हरी वानखेडे (रा. जगवाणीनगर), सुरेश चांगो ठाकरे (रा. टिळकनगर) हे जुगार खेळताना आढळून आल्याने कारवाई केली आहे.
पत्त्याचा डाव उधळून लावल्यानंतर जिल्हापेठ पोलिसांनी ७० ते ८० हजार रूपयांची रोकड त्याठिकाणाहून जप्त केली़ तसेच अंगझडतीमध्ये आढळून आलेले दहा ते बारा मोबाईल व रोकडही पोलिसांनी जप्त केली आहे़ ही कारवाई जिल्हापेठ पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार भटू नेरकर, उमेश पाटील, शिवाजी धुमाळ, छगन तायडे, अविनाश देवरे, संजय जाधव, महेंद्र बागुल, प्रमोद पाटील, योगेश ठाकूर यांनी केली आहे़ तसेच प्रशांत जाधव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.