जळगाव प्रतिनिधी । शनिवारी मध्यरात्री बेकायदेशीर वाळूची वाहतूक करणाऱ्या डंपरचा पाठलाग करून चालकासह क्लिनरला शनीपेठ पोलीसांनी अटक केली आहे. शनीपेठ पोलीस ठाण्यात चालक, मालक आणि क्लिनरवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील कांचन नगर परिसरात शनीवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास रेल्वेलाईन ममुराबादकडून जळगावात विना नंबर क्रमांक डंपरमध्ये अवैधरित्या वाळूची वाहतूक करत असल्याचे दिसून आले. डंपर रोखण्याचा प्रयत्न केला असता डपंर चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. दरम्यान डंपरचा पाठलाग केला असता शनीपेठ पोलीस हद्दीतील भिलपूरा पोलीस चौकीजवळ थांबविले. डंपरचालक शेख रईस शेख रऊफ (वय-२३) आणि शेख शाबीर शेख युनूस (वय-१९) रा. ख्वाजा चौक आव्हाणे रा. खेडी ता.जि.जळगाव यांना अटक केली आहे. हे वाहन भूषण सपकाळे (पुर्ण नाव माहित नाही) रा. खेडी ता.जि.जळगाव यांचे आहे. शनीपेठ पोलीस हद्दीत डंपर जप्त करण्यात आले आहे. पोलीस कॉन्टेबल सचीन प्रकाश महाजन यांच्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी स्वप्नील नाईक, पो.ना. विजय पाटील, नंदलाल पाटील, सचिन महाजन यांनी कारवाई केली. पुढील तपास पोहेकॉ किरण पाठक करीत आहे.