जळगावातून दुचाकी चोरीप्रकरणी एकास अटक; पोलीसात गुन्हा

4444

जळगाव प्रतिनिधी । शहरातील मानस हॉटेलजवळील सलार नगरात असलेल्या दुकानासमोर पार्किंग केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केली होती याप्रकरणी एकास अटक केली असून चोरी केलेली दुचाकी हस्तगत केली आहे. संशयित आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, लालु राधेलाल चौधरी (वय-३९) रा. मानस हॉटेलच्या जवळ सलार नगर यांचे अजिंठा चौफुलीजवळ बाबुंचे दुकान आहे. २६ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता दुचाकी क्रमांक एमएच १९/बीसी ८७१७ दुकानासमोर लावली होती. सायंकाळी घरी जाण्यासाठी दुचाकीजवळ गेले असता ती मिळून आली नाही. दुचाकी चोरी गेल्याप्रकरण एमआयडीसी पोलीसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होता एमआयडीसी पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवत संशयित आरोपी सुरज हरीष खंगार (वय-२४) रा. मेस्को माता मंदीर, जैनाबाद याला दुपारी अटक केली.

यांनी केली कारवाई
पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, सचिन मुंडे, गोविंदा पाटील, किशोर पाटील, इम्रान सय्यद यांनी आरोपी यास अटक केली होती. त्याचेकडून गुन्ह्यातील मोटरसायकल हस्तगत करण्यात आली. आरोपी यास आज न्यायालयात हजर केले असता न्यायमूर्ती अक्षी जैन यांनी न्यायालयीन कोठडी देऊन त्याची कारागृहात रवानगी केली आहे. सदरची मोटरसायकल आरोपी याने दारूसाठी पैसे मिळवण्याकरता चोरलेली होती.

Protected Content