जळगाव प्रतिनिधी । शहरातील एका भागात राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी १६ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला आहे. २० डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी घरात कुणालाही काहीही न सांगता घरातून बेपत्ता झाला. मुलीच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोधाशोध केली परंतू आढळून आलेली नाही. दरम्यान, तीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा आरोपी मुलीच्या आईने केला आहे. याप्रकरणी मंगळवारी २१ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता मुलीच्या आईने रामानंदनगर पोलीस ठाणे गाठले व तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनिल पाटील करीत आहे.