जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील विविध विकास कामांसाठी वापरण्यात येणाऱ्या विना क्रमांकाच्या ट्रॅक्टर वाहनांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस वक्ता प्रशिक्षण विभागाने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना आज सोमवार ४ जानेवारी रोजी निवेदनात करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव शहरात विविध ठिकाणी रस्ते गटारी अमृत योजनेची कामे सुरू आहे. विविध कामांसाठी सुरू असलेल्या विकास कामांसाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरांवर नंबर लावलेले नाही. त्यामुळे उपप्रादेशिक विभागाकडून कारवाई केली जात नाही. तसेच एखादा अपघात या वेगाने जाणाऱ्या ट्रक्टरांकडून झाल्यस त्या ट्रक्टरचा शोध घेता येत नाही. जळगाव शहरात विना क्रमांकाची १६ ते १७ ट्रॅक्टर्स असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे वक्ता प्रशिक्षणचे जिल्हाध्यक्ष साहिल पटेल, अल्पसंख्यांक महानगराध्यक्ष डॉ. रिझवान शेख, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष कौसर काकर, महानगर सरचिटणीस विशाल देशमुख, महानगर उपाध्यक्ष अकील पटेल, जनमत प्रतिष्ठानचे पंकज नाले, मोईन पटेल, गणेश सोनगिरे, जाकीर पिंजारी यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
https://www.facebook.com/508992935887325/videos/866500590832284