जळगाव प्रतिनिधी । कोरोनामुळे रिक्षा चालकांचा व्यवसाय अनेक दिवसांपासुन बंद आहे. मात्र त्यांना लॉकडाऊन काळात तातडीने दहा हजारांची मदत द्यावी, अन्यथा रिक्षा चालक रस्त्यावर उतरतील असा इशारा नेताजी सुभाषचंद्र बोस रिक्षा युनियनचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद सोनवणे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, प्रत्येक रिक्षाचालक रिक्षा खरेदी करतांना 35 हजार जीएसटी भरतो. तसेच विविध स्वरूपात कर जमा करीत असतो. देशाच्या अर्थव्यवस्थेत आणि विकासात रिक्षा चालकांचे योगदान आहे. रिक्षा चालकांचा अंत न पाहता, त्यांना आर्थिक मदत द्यावी. शेतकरी, बांधकाम कामगारांना ज्या प्रमाणे मदत देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे रिक्षा चालकांनाही मदत करावी.तसेच त्यांना तातडीने दहा हजार रूपये अनुदान द्यावे, अशी मागणी जिल्हाध्यक्ष प्रल्हाद सोनवणे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.