जळगाव प्रतिनिधी । शहरातील भजे गल्ली पोलीसांनी आज सायंकाळी कारवाई करत अंडापाव, अंडा भूर्जी विक्रेत्यांना तळीरामांना दारू पिऊ दिल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी केली.
शहरात कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे आणि विभागीय पोलीस अधिकारी कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी शहरातील भजे गल्लीतील अंडाभूर्जी विक्रेत्यांवर कारवाई केली. अंडाभूर्जी गाडीवर तळीरामांना दारू पिऊ देवू नये अन्यथा विक्रेत्यांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला.