जळगाव प्रतिनिधी । शहरातील एका भागात नोकरीनिमित्ताने वास्तव्यास असलेल्या २८ वर्षीय तरूणीवर लग्नाच्या आमिषाने एकाने सलग ५ वर्ष बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अधिक माहिती अशी की, बाहेरील जिल्हयातील एक तरूणी नोकरीनिमित्ताने जळगाव शहरातील एका भागात वास्तव्यास आहे. यादरम्यान संपत लक्ष्मण मल्हाड रा. दरीबडची ता. जत, जि. सांगली हा तरुणीच्या संपर्कात आला. त्यानंतर त्याने तरुणीला लग्नाचे आमिष देत तसेच जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार केला. सन २०१६ ते ६ सप्टेंबर २०२१ या कालावधीत घडलेल्या घटनेप्रकरणी तरुणीने सोमवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्या तक्रारीवरून संपत मल्हाड याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे हे करीत आहेत.