जळगाव प्रतिनिधी । लग्नास नकार दिल्याने २३ वर्षीय तरूणीच्या मोबाईलवर मॅसेज करून धमकी दिल्याप्रकरणी पुण्यातील तरूणाविरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, शहरातील एका भागात राहणारी २३ वर्षीय तरूणी आपल्या कुटुंबियांसह राहते. तीची पुण्यातील हिंजवाडी येथे राहणारा सचिन त्र्यंबक जाधव या तरूणाशी ओळख २०१९ मध्ये झाली. दरम्यान सचिन जाधव या तरूणाचे तरूणीशी मॅसेजवरून चॅटींग सुरू झाली. दरम्यान, ३१ डिसेंबर २०१९ रोजी पासून ते आजपर्यंत सचिन जाधवने तरूणीला लग्नाची मागणी घातली. मात्र तरूणी लग्न करण्यास नकार दिला. याचा राग आल्याने संशयित आरोपी सचिन जाधव याने तरूणीच्या मोबाईलवर मॅसेज टाकून त्रास देण्यास सुरूवात केली. त्यानंतर लग्न करण्यासाठी धमकी देण्यास सुरूवात केली. याला कंटाळून तरूणीने सोमवारी २६ जुलै रोजी दुपारी ३ वाजता एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून सचिन जाधव याच्या विरोधात तक्रार दिली. तरूणीच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी सचिन जाधव याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय भोई करीत आहे.