जळगाव, प्रतिनिधी । जळगाव जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे राष्ट्रीय खेळाडू संजय मधुकर तायडे व तेजस संजय तायडे या पिता-पुत्राने महाराष्ट्र अॅथलेटिक्स असोसिएशन आयोजित व्हर्चुअल रन स्पर्धेत यश प्राप्त केले.
संजय मधुकर तायडे यांनी ५.०२ की.मी.अंतर ०:४६:५५ सेकंदात पूर्ण केले तर तेजस संजय तायडे याने १.०३ की.मी.चे अंतर ०:०३:३९ सेकंदात पूर्ण केले. विशेष म्हणजे दोन्ही पिता-पुत्र जळगाव जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे राष्ट्रीय खेळाडू आहेत. या यशाबाबत महाराष्ट्र राज्य अॅथलेटिक्स असोसिएशनतर्फे त्यांना मेडल,प्रमाणपत्र व टी-शर्ट देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या या यशाबद्दल जळगाव जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार्थी डॉ.नारायण खडके, चेअरमन प्रा. एम. वाय. चव्हाण, कार्याध्यक्ष डॉ. पी. आर. चौधरी, सचिव राजेश जाधव, डॉ. विजय पाटील, बन्सी माळी, प्रा. ईकबाल मिर्झा, गिरीश पाटील, किशोर पाटील, निलेश पाटील, प्रविण पाटील यांनी अभिनंदन केले आहे.